प. महाराष्ट्रातील सलोख्याची वीण उसवण्यासाठी हिंदुत्ववादीशक्ती टोकदारपणे प्रयत्नशील झाल्याचे उघड झाले आहे. पुरोगामी समाज हा हल्ला कसा परतवणार?

ऐतिहासिक वारशातून निर्माण झालेली सलोख्याची वीण महाराष्ट्राचे सामाजिक वैभव आहे. प. महाराष्ट्र हा केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला पुरोगामी विचारांचा वारसा देणारा हा परिसर आहे. याच वारशामुळे महाराष्ट्र ‘पुरोगामी विचारांचे आगर’ मानले जाते. प्रत्येक नवा विचार मग तो स्त्रीमुक्तीचा असो वा जातीअंताचा असो किंवा धर्मांधता विरोधाचा असो, महाराष्ट्र कायमच सजगपणे आपला वारसा टिकवून आहे.......

देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे आद्य प्रवर्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! परंतु हिंदू महासभा, गीता प्रेस परिवार यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारप्रवाह रा.स्व. संघाच्याही आधीपासून सक्रिय होता!

महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या सजग नागरिकांचा असा समज असतो की, देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे आद्य प्रवर्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! परंतु हिंदू महासभा (स्थापना १९०५), गीता प्रेस परिवार यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारप्रवाह रा.स्व. संघाच्याही आधीपासून सक्रिय होता. एवढेच नाही तर देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे जनकत्व आणि राजकीय सूत्रे उत्तर भारतातील याच गटांकडे जातात.......